बंद

श्री सोमेश्वर मंदीर

श्रेणी धार्मिक

हे मंदीर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे.गोदावरी तीरी असलेल्या हया मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे.दर्शनांनतर नदीत बोटिंग व पोहण्याचा आनंद घेता येतो. सोमेश्वर हे चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील प्रसिध्द आहे.सोमेश्वरला जातांना ‘’आनंदवल्ली’’ नावाचा परिसर लागतो.या परिसराचे नांव पेशवे राघोबादादा यांचे पत्नी आनंदीबाई यांचेमुळे ठेवण्यात आले आहे.त्यांचा हया ठिकाणी काही काळ निवास होता. त्यांनी आनंदवल्ली येथे गोदावरी तिरावर नवश्यागणपतीचे आकर्षक मंदिर बांधले आहे.

  • सोमेश्वर मंदिर
  • सोमेश्वर मंदिर
  • सोमेश्वर मंदिर
  • सोमेश्वर मंदिर
  • सोमेश्वर मंदिर

कसे पोहोचाल?:

हवाई मार्गे

सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.

रेल्वे द्वारे

जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड 15 किमी आहे

रस्त्याने

शहरात आणि नाशिक सेंट्रल बस स्थानकापासून 6 कि.मी.