बंद

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म भगुर येथे झाला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकचे भूषण आहे. एकाच वेळी दोन जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे क्रांतीसुर्य सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे.

Hutatma Anant Kanhere

हुतात्मा अनंत कान्हेरे

स्वातंत्र्य चळवळीत कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थिएटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे नाशिकच्या क्रांतिकारकांच्या इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी आहेत. प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा ध्वज फडकविण्यात हुतात्मा कान्हेरेंचा मोलाचा वाटा आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी मातृभुमीचे रक्षण करण्यासाठी नवा इतिहास निर्माण केला.

Kusumagraj

वि.वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी व लेखक वि.वा.शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांनी नाशिकचे नाव जागतिक पातळीवर नेले. त्यांच्या नटसम्राट नाटकाने तर इतिहास घडवला. मानवतेचा संदेश देणार्या कुसुमाग्रजांच्या कविता रसिक वाचकांनी मनात जपुन ठेवल्या आहेत. शिरवादकरांजवळ निर्मत्सरी, निरहंकारी, निर्मळ आणि विशुध्द माणुसकी मानणारे प्रगल्भ मन होते. माणुसकी, प्रेम, सत्य, सौंदर्य, शिवम या चिरंतन मुल्यांशी त्यांची बांधिलकी होती. सत्कार समारंभ, गौरव आणि मानसन्मान यापासुन नेहमीच दूर राहणार्या शिरवाडकरांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून नाशिक परिसरातील त्यांच्या सुह्रदांनी, चाहत्यांनी २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान ची स्थापना केली.

Kanetkar.

प्रा.वसंत कानेटकर

मराठी प्रायोगिक, समांतर, व्यावसायिक रंगभुमीवर आपल्या आशयप्रधान नाटकांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रा.वसंत कानेटकर रंगभुमीच्या इतिहासात वैविध्यपुर्ण नाटकांमुळे अजरामर ठरले आहेत. रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, सुर्याची पिल्ले, वादळ माणसाळतय, लेकुरे उदंड जाहली, गगनभेदी, सोनचाफा, प्रेमाच्या गावा जावे अशा असंख्य नाटकांनी मराठी व्यावसायिक रंगभुमीला नवी झळाळी प्राप्त करुन दिली.

Dadasaheb Phalake.

दादासाहेब फाळके

भारतीय चित्रपट उद्योगाचा पाया घालणारे चित्रमहर्षी दादासाहेब उर्फ धुंडीराज फाळके नाशिकचेच रहिवाशी होते. चित्रपट निर्मितीकरता प्रथम डायमंड पिक्चर्स कॉर्पोरेशन ही संस्था स्थापन करुन सन १९१३ साली भारतात प्रथम चित्रपट राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके यांनी काढला. फाळकेंनी अनेक आशयप्रधान व तंत्राचे वेगळेपण असणार्या चित्रपटांची निर्मिती करुन चित्रपट क्षेत्राला नवीन दिशा दिली. शासनाच्या वतीने दिला जाणारा फाळके पुरस्कार त्यांच्या कार्याची महती सांगणाराच आहे.

Dadasaheb Gaaikwad.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड

भारतभर भूमिहीनांच्या हक्कासाठी व्यापक पातळीवरील लोकलढ्याचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, वसतीगृहांची चळवळ, काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेबांनी केले. समाज लढ्यात योगदान देणारं त्यांच कार्य सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

Bagul

बाबूराब बागूल

दलित कथेचा प्रारंभ बाबूराव बागूल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहापासून झाला. दलित साहित्याला बाबूराव बागूलांनी आत्मभान दिले. मरण स्वस्त होत आहे, सूड हि दिर्घकथा या बागुलांच्या साहित्यकृती मराठी कथेच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. अघोरी, दलित साहित्य, आजचे क्रांती विज्ञान, आंबेडकर भारत या त्यांच्या पुस्तकांनी विद्रोहाचा एक वेगळा अविष्कार दाखविला आहे.

Vamandada

वामनदादा कर्डक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आपल्या गीतांच्या माध्यमातून पोहचविणारे वामनदादा कर्डक संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशात व कर्नाटकातही गाजले. त्यांनी तीन हजारापेक्षा अधिक गाणी लिहीली व समाजाच्या कानाकोपर्यात पोहचविली. आम्ही तुफानातील दिवे हे त्यांचे गीत कायम गाजत राहिले. वाटचाल, मोहोळ, माझ्या जीवनाचं गाणं ही त्यांची पुस्तके प्रसिध्द आहे. सांगत्ये ऐका व पंचारती या चित्रपटांसाठी त्यांनी गीते रचली. आपले समग्र जीवन परिवर्तनाच्या लढाईत सैनिक शिलेदार म्हणून त्यांनी व्यतीत केले.

P Paluskar

पं.विष्णु दिगंबर पलुस्कर

पंडितजींनी संगीतावर पुस्तके संकलित केली.पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील नोटेशन पद्धतीवर आधारित, त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी योग्य असलेली आपल्या स्वत: ची नोटेशन प्रणालीची रचना केली.त्यांनी भारताचे राष्ट्रीय गान आणि प्रसिद्ध देशभक्तीपर गीत सरे जहांसे अछा साठी संकेतांकही रचनाही केली, जे शास्त्रीय संगीत आधारित धुन आहेत.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू केला.ते स्वत: भारतीय शास्त्रीय संगीताचे एक संस्था होते.एक उत्कृष्ट आणि प्रसिद्ध गायक म्हणूनही त्यांनी दिव्य संगीत आणण्यासाठी प्रयत्न केले.ते सर्वसाधारणपणे भारतीय समुदायासाठी आता ओळखले जातात त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत.अर्ध-शास्त्रीय संगीतासाठी त्यांची रचना लोकप्रिय झाली1 9 24 मध्ये त्यांनी नाशिक येथे रामनाथ आश्रमची स्थापना केली.

Tantiya Tope

तात्या टोपे

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले. १८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती. नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता. तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.