बंद

महत्वाची ठिकाणे

महत्वाचे ठिकाण माहिती
आर्टिलरी सेंटर

आर्टिलरी सेंटर

तोफखाना केंद्र

देवळाली तोफखाना हे नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्ड देखील आहे. तसेच या ठिकाणी रणगाडे/ तोफखाना संग्रहणालय आहे. आशिया खंडातील हे सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. सदरचे तोफखाना केंद्र सन 1947 मध्ये पाकिस्तानमधून नाशिक येथे स्थलांतरीत झालेले आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसेच जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तसेच बोफोर्स तोफांचे देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

 नाणे संग्रहालय

नाणे संग्रहालय

नाणे संग्रहणलय अंजनेरी

नाशिक शहरापसून सुमारे 20 कि.मी. अंतरावर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोडवर नाणे संग्रहणालय आहे. नाणे संग्राहलयात भारतातील नोटांचा व नाण्यांचा इतिहास व शोधांबद्दल या ठिछकाणी चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध आहे. सदर नाणेसंग्रहालय हे सन 1980 मध्ये सुरु करण्यात आलेले आहे. अशा प्रकारचे आशिया खंडामधील ते एकमेव संग्रहालय आहे. सदर संग्रहलयाच्या आजूबाजूचा परीसर अतिशय प्रसन्न असून अंजनेरी टेकडीच्या बाजूला बसलेले आहे.

गारगोटी खनिज संग्रहालय

गारगोटी खनिज संग्रहालय

गारगोटी खनिज संग्रहालय

सदरचे गारगोटी संग्रहालय हे सिन्नर येथील माळेगांव एमआयडीसी क्षेत्रामध्ये नाशिक पासून सुमारे 28 कि.मी. अंतरावर आहे. सिन्नर हे छोटी नगरपालिका असलेले शहर असून या ठिकाणच्या गारगोटी संग्रहालयाने वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केलेले आहे. हिरासदृश्य विविध खनिजांचे हे अत्युकृष्ट असे संग्रहालय आहे. या ठिकाणी अ तिशय मौल्यवान असे विविध प्रकारचे खनिज पहायला मिळतात. या संग्रहालयास प्राईड ऑफ इंडिया, सरस्वती पुरस्कार, सिन्नर गौरव अशा प्रकारचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध प्रकारचे रंगीबेरंगी खडक, स्फटीक, वेगवेगळया प्रकारामध्ये व आकारामध्ये या ठिकाणी आकर्षकपणे प्रदर्शित केलेले हे भारतातील एकमेव संग्रहालय आहे. या ठिकाणी दोन प्रकारची दालने असून पहिल्या मजल्यावर दख्खनचे पठार खनिजे तर तळमजल्यावर प्रतिष्ठा गॅलरी प्रदिर्शित केलेली आहे. सदर ठिकाणी पर्यटकांना विविध खरेदीसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे.

दादासाहेब फाळके संग्रहालय

दादासाहेब फाळके संग्रहालय

दादासाहेब फाळके संग्रहालय

सदरचे संग्रहालय हे नाशिक शहराजवळच नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वर नाशिक मुख्य बसस्टॅण्ड पासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर आहे. भारतीय सिनेमाचा आत्मा म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. भारतीय सिनेमा सृष्टीचे ते आद्यजनक होते. त्यांचा जन्म नाशिक येथे 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता. सन 1913 मध्ये त्यंानी भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा निर्माण केला. नाशिकच्या स्टुडीओमध्ये 1932 पर्यंत त्यांनी 95 चित्रपट व 26 डॉक्युमेंटरी चित्रपट बनविले. सदरचे संग्रहालय हे दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये केलेल्या दूरदृष्टी परिश्रमांना नम्र श्रध्दांजली म्हणून निर्माण करण्यात आलेले आहे. या परिसरात मेडीटेशन हॉल, मिटिंग हॉल व प्रदर्शनाची वेगवेगळी दालने आहेत. तसेच स्मारकामध्ये दादासाहेबांनी केलेल्या विविध कामांचे प्रदर्शन मांडलेले आहे. सुमारे 29 एकराच्या भव्य परीसरामध्ये हे स्मारक/संग्रहालय वसलेले आहे. या ठिकाणी बुध्द स्मारक, सुशोभित बगीचा व गाण्यांवर नाचणारे कारंजे देखील आहेत.

Someshwar Water Falls

दुधसागर धबधबा

दुधसागर धबधबा

नाशिक सदरचा दुधसागर धबधबा हा नाशिक पासून सुमारे 8 कि.मी. अंतरावरील सोमेश्वर येथे आहे. सदर धबधबा हा प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. सुमारे 10 मीटरचा शुभ्र पाण्याच्या फेसाने फेसाळलेला या धबधब्याला दुध सागर हे नाव पडलेले आहे. दुधसागर म्हणजे एक प्रकारे दुधाच्या समुद्राचा आभास सदर ठिकाणी निर्माण होतो.

दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा

त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर त्र्यंबकेश्वर पासून 10 कि.मी. अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे. नाशिकच्या काही अत्युकृष्ट नैसर्गिक सौदर्यापैकी दुगारवाडी हा एक धबधबा आहे. जव्हाररोडपासून सुमारे 2 कि.मी. आतमध्ये हा धबधबा आहे. पावसाळयामध्ये निसर्गप्रेमी पर्यटक एक दिवसाच्या सहलीसाठी पावसाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या परीसरातील पसंती देतात. पावसाळयामध्ये या परीसराचे सौंदर्य व हवामान अतिशय उत्साहवर्धक व प्रसन्न असे असते. बऱ्यापैकी घनदाट जंगल, सुंदर व प्रसन्न हवामान या ठिकाणी पर्यटक स्वत:चे शहरी जीवनातील ताणतणाव, थकवा, अडीअडचणी विसरुन निसर्गांचा आनंद घेतात.