बंद

कृषी

वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षत्राशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करुन ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली आधुनिक कृषितंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करणारी एकच यंत्रणा असावी यादृष्टिने कृषि विभागाची रचना करण्यांत आलेली आहे. सुलभ संपर्कासाठी प्रत्येकी तीन ते चार खेडयांसाठी एक कृषि सहायकाचे पद देण्यांत आलेले आहे. या कृषि सहायकाचे कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकरी कुटुंबाची सरासरी संख्या ८०० ते ९०० पर्यत असल्यामुळे कृषि तंत्रज्ञान थेट शेतक-यांपर्यत पोचविणे सुलभ झाले आहे. कृषि विषयक सर्व योजना राबवल्या जातात. यावर मंडलस्तरावर मंडल कृषि अधिकारी यांचे नियंत्रण असते. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषि अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व संभागस्तरावर विभागीय कृषि सह संचालक यांची कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेकडे कृषि विकास अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय नियंत्रणाखाली पंचायत समितीस्तरावर कृषि अधिकारी हे निरनिराळया कृषि निविष्ठाविषयक योजना राबवतात.

कृषी विभाग नाशिक बद्दल : नाशिक जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती

अ.क्र. तपशील संख्या
भौगोलिक क्षेत्र 15548 चौरस किलोमीटर
एकूण तालुके 15
एकूण गावे 1960
एकूण लोकसंख्या 61,09,052
खातेदार संख्या 6,42,662
अल्पभूधारक 3,50,956 (54%)
अत्यल्पभूधारक 2,88,496 (44%)
इतर 3,210 (02%)
खरीप गावे संख्या 1577
१० रबी गावे संख्या 383

विविध योजना :

  1. जलयुक्त शिवार अभियान
  2. कृषि यांत्रिकीकरण उपअभियान
  3. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
  4. प्रधान मंत्री पिक विमा योजना
  5. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

जलयुक्त शिवार अभियान २०१७ – १८ संक्षिप्त (नाशिक जिल्हा)

अ.क्र. तपशील संख्या
जलयुक्त अंतर्गत निवड केलेली एकूण गावे संख्या २०१ (एकूण १४ तालुके)
एकूण सुरु केलेली कामे संख्या ४१७५
एकूण पूर्ण झालेली कामे संख्या ४१००
एकूण प्रगतीपथावरील कामे संख्या ७५
एकूण गाळ काढणे झालेली कामे संख्या ६५६
एकूण काढलेला गाळ १४,४२,९७९ घ.मी.
गाळ टाकण्यात आलेले जमीन क्षेत्र हे. २३६७ हे.
मूळ आराखडा (अ+ब+क) रु. ८८.५२ कोटी
सुधारीत आराखडा (अ+ब+क) रु. ८८.१४ कोटी
१० एकूण उपलब्ध निधी रु. ७३.९७ कोटी
११ एकूण झालेला खर्च रु. ४७.०५ कोटी

मार्च – २०१८ अखेर झालेल्या / होणाऱ्या कामांची संख्या व त्यामध्ये निर्मित होणारा पाणीसाठा

अ.क्र. तपशील संख्या
एकूण निर्माण होणारा पाणीसाठा २८३०५ TCM
अंदाजे संरक्षित सिंचित क्षेत्र (हे.) १ पाणी पाळी ५६६१० हे.
अंदाजे संरक्षित सिंचित क्षेत्र (हे.) २ पाणी पाळी २८३०५ हे.
ऑनलाईन जिओ टॅगींग झालेली कामे संख्या ३९०४ ( ९३.७३%)

मागेल त्याला शेततळे :

मागेल त्याला शेततळे हि योजना शासनाने शासन निर्णय क्रमांक शेततळे – २०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५ मंत्रालय मुंबई – ३२ दिनाक -१७ फेब्रुवारी २०१६ अन्वये मंजूर केली आहे.

  • लाभार्थी पात्रता

    1. शेतक-यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी. त्यात कमाल मर्यादा नाही.
    2. लाभार्थी शेतक-याची जमीन शेततळया करिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील.
    3. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
    4. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे. त्यांच्या वारसांना निवड प्रक्रीयेमध्य जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात यावी.
    5. वरील व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणा-या शेतक-यांची जेष्ठता यादीनुसार (प्रथम अर्ज सादर करणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे) निवड.
  • आवश्यक कागदपत्रे :

    1. जमिनीचा ७/१२ उतारा
    2. ८ – अ उतारा
    3. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कार्ड / आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला.
  • लाभार्थ्याकडून अर्ज मागविणे :

    1. इच्छुक शेतक-यांनी विहित नमुन्यातील अर्ज तथा संमती योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य. शेतक-यांनी त्यांची मागणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज http://aaplesarkar.maharashtra.gov.inhttps://egs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करूनदेण्यात आला आहे. लाभार्थ्याने प्रपत्र २ मधील नमूद माहिती जमा करून मुळ अर्ज भरून अर्जदाराने स्वतःच्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे इत्यादीसह स्कॅन (Scan) करून अर्जाची माहिती Online भरून सर्व Scan कागदपत्रासह Upload करावी.
    2. Upload करण्याची प्रक्रिया दि.२९ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून उपलब्ध राहतील.
    3. योजनेत अर्ज करणा-या व्यक्तीने आपले सरकार संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याला शेततळे या लिंकवर क्लिक केल्यावर खालील पर्याय उपलब्ध राहतील.
      1. आपले सरकार संकेत स्थळावर यापूर्वीच तयार केलेल्या प्रोफाईलचा वापर करणे.
      2. आपले सरकार पोर्टलवर नव्याने प्रोफाइल तयार करुन (वरील १ नुसार प्रोफाईल उपलब्ध नसल्यास)
      3. कोणत्याही महा ई सेवा केंद्रामार्फत (CSV मध्ये) यामधील पर्यायाकरिता स्वतःचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक राहील. स्वत सायबर कॅफेतून संगणकाचा वापर करून अर्ज भरू शकतो. अर्जासाठी सेवा शुल्क रु.२०/- अधिक सेवाकर लागू राहील. मोबाईल नसल्यास महा ई सेवा केंद्रावरून अर्ज भरत असताना वरील बाबीसाठी (Scaning, Upload ect) प्रक्रिया महा ई सेवा केंद्र चालकामार्फत करावी.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक यांचे अधिनस्त कार्यालयाचें दुरध्वनी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
अ. क्र. जिल्हा एस.टी.डी. कर्यलायाचा नंबर फैक्स इमेल
नाशिक 0253 2504042, 2505534 2504042 dsaonsk @ rediffmail.com, dsaonashik@gmail.com
कृषि उपसंचालक
अ. क्र. जिल्हा एस.टी.डी. कर्यलायाचा नंबर फैक्स इमेल
नाशिक 0253 2504042, 2505534 2504042 dsaonsk @ rediffmail.com, dsaonashik@gmail.com
उपविभागीय कृषि अधिकारी
अ. क्र. जिल्हा एस.टी.डी. कर्यलायाचा नंबर फैक्स इमेल
नाशिक 0253 2595138 2595138 nashik.sdao@rediffmail.com
निफाड 02550 241132 241132 sdao_niphad@rediffmail.com
कळवण 02592 250055 221402 kwn_sdao@ rediffmail.com, sdaokwn@gmail.com
मालेगाव 02554 250518 250518 sdaomlg13@rediffmail.com
तालुका कृषि अधिकारी
अ. क्र. जिल्हा एस.टी.डी. कर्यलायाचा नंबर फैक्स इमेल
नाशिक 0253 2590885 2590885 taonashihnashik@rediffmail.com
त्र्यंबक 2594 233485 233485 taotrambak@gmail.com
पेठ 2558 225508 225508 taopeth1@rediffmail.com
इगतपुरी 2553 244633 244633 tao_igatpuri@rediffmail.com
5 निफाड 2550 241156 241156 taoniphad@gmail.com
सिन्नर 2551 220068 220068 taosinnar@rediffmail.com
चांदवड 02556 252267 252267 tao.chandawad2556@gmail.com
येवला 02559 266562 266562 taoyeola@gmail.com
मालेगाव 02554 254760 254760 tao.mlg@rediffmail.com
१० सटाणा 02555 223907 223907 taosatana09@rediffmail.com
११ नांदगाव 02552 242302 242302 taonandgaon@rediffmail.com
१२ कळवण 02592 250076 222736 taokalwan@gmail.com
१३ दिंडोरी 02557 221076 221076 talukadindori@gmail.com
१४ सुरगाणा 02593 223350 223350 sur_tao@rediffmail.com
१५ देवळा 02592 229611 tao_deola@rediffmail.com taodeola15@gmail.com