कुशावर्त तिर्थ
कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी.अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले.गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करुन मग त्र्यंबकेश्चर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासुन नंतरच्या नदीप्रवाह कुशावर्तात येऊन पुढे वळण घेतो. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. या तीर्थकुंडाच बांधकाम इ.स. १७५० मध्ये झाले आहे. आत उतरण्यासाठी १५ दगडी पायर्या व त्या चारही बाजूने आहेत. अलीकडे येथे संरक्षणात्मक जाळी लावली आहे. गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते अशी पौराणिक कथा आहे.
कसे पोहोचाल?:
हवाई मार्गे
सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे द्वारे
जवळचे रेल्वे स्टेशन नाशिकरोड आहे जे साधारण 40 किमी अंतरावर आहे.
रस्त्याने
नाशिक रस्तामार्गे चांगले जोडलेले आहे, नाशिक ते त्र्यंबकेश्वर जवळ जवळ 30 कि.मी. अंतर आहे,