श्री सप्तश्रृंगी गड
श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे.
यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’’ मानले जाते.देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे.या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘’सप्तश्रृंग’’ हया शब्दाचा अर्थ ‘’सातशिखरे’’ असा आहे.गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत.गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे.हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते.या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.
कसे पोहोचाल?:
हवाई मार्गे
सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे द्वारे
जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड 75 किमी आहे
रस्त्याने
नाशिक रस्तामार्गे चांगले जोडलेले आहे, नाशिक तेसप्तशृंगी मंदिर जवळ जवळ 65 कि.मी. आहे,